Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बिहारप्रमाणे महाराष्ट्रात व्हावी जातीनिहाय जनगणना : अजित पवार

बिहारप्रमाणे महाराष्ट्रात व्हावी जातीनिहाय जनगणना : अजित पवार



मुंबई : खरा पंचनामा

जातीनिहाय जनगणना व्हावी, असा ठराव विधानसभा अध्यक्षांनी मांडला आणि त्यास सगळ्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र त्यास सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आता केंद्राची मदत न घेता बिहारप्रमाणे महाराष्ट्रात जनगणना व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

त्यानुसार बिहारची माहिती मागवली असून, महाराष्ट्राने जातीनिहाय जनगणना करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे स्पष्ट केले. तसेच ही बाब खर्चिक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

सगळ्या समाज घटकांना कोण किती आहे हे समजायला हवे, असाही निर्वाळा पवार यांनी दिला. राष्ट्रवादी भवनातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, विष्णूपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार दिलीप बनकर, सरोज आहिरे आदी उपस्थित होते. नाशिकच्या छगन भुजबळ यांच्या पालकमंत्रिपदाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, की हा पक्षांतर्गत विषय आहे. मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांना खाती देणे, पालकमंत्री नेमणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मात्र पुढे चांगल्या गोष्टी घडतील.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.