मराठ्यांना अंगावर घेऊ नका, मोदींनी फडणवीसांना समज द्यावी!
मनोज जरांगे यांचा इशारा
जालना : खरा पंचनामा
जालन्यामधील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे.
गुणरत्ने सदावर्तेनी मनोज जरांगेंना अटक केल्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर जरांगेनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे फडणवीस यांना समज देण्याची मागणी आपल्या भाषणात केली. तसेच आपल्याला अटक करणं हे सोपं आहे का? असा सवाल जरांगेंनी सदावर्तेना विचारला आहे.
"सदावर्ते हे फडणवीसांचे कार्यकर्ते आहेत असं लोक म्हणतात. फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी", असं जरांगेंनी आपल्या भाषणात म्हटलं. सदावर्तेंचा एकेरी उल्लेख करत जरांगेंनी कठोर शब्दांमध्ये त्यांच्यावर टीका केली. "ते (सदावर्ते) रात्री म्हणलं मला अटक करा. ते म्हणतंय मी हिंसा करीन. अरे, मराठ्यांची औलाद हिंसा करणाऱ्यांची नाही. त्याला यश मिळायचं होतं तेव्हा त्याने एक मराठा आणि लाख मराठाची घोषणा आझाद मैदानात दिली होती. आता एक लाख मराठे एकत्र आलेत, लेकरांचं कल्याण होणार आहे. ह्यो हिंसा करणार आहे आणि याला अटक करा. मला अटक करणं एवढं सोपं आहे का?" असं म्हणातच उपस्थितांनी जरांगेंना प्रतिसाद दिला.
सदावर्तेना लक्ष्य करताना जरांगेंनी फडणवीस यांचा थेट उल्लेख केला. "भाऊ तुला एकदा सुट्टी दिली मराठ्यांनी. तू मराठ्यांचं वाटोळं केलं आहे. मराठ्यांच्याविरोधात तुच कोर्टात गेला आहेस. मराठ्यांविरोधात आग ओकणं कमी करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याला समज द्या. तो तुमचा कार्यकर्ता आहे. मराठे अंगावर घेऊ नका. याच मराठ्याने तुम्हाला 106 आमदार निवडून दिलेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणण्यात मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. पंतप्रधान साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना समज द्या. खालचे कार्यकर्ते ते अंगावर घालत आहेत," असं म्हणत जरांनी थेट पंतप्रधान मोदींना फडणवीसांना समज देण्याची मागणी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.