फोन टॅपिंगचे आरोप झालेल्या रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक!
मुंबई : खरा पंचनामा
फोन टॅपिंगचे आरोप झालेल्या व नंतर क्लीन चिट मिळालेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर होत्या. राज्य सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी दणका मानला जात आहे.
राज्य सरकारनं आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची व नव्या नियुक्त्यांची घोषणा केली. सध्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे डिसेंबरमध्ये निवृत्त होणार होते. त्यांनी आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानं त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या अधिकारी आहेत.
एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर बुधवारी सेवानिवृत्त झाल्यानं हे पद रिक्त झालं होतं. त्यांच्या जागी माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश सेठ यांनी स्वत: या पदासाठी अर्ज केला होता. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं अर्जांची छाननी करून तीन नावांची अंतिम यादी मुख्यमंत्र्यांकडं विचारार्थ पाठवली होती. त्यात रजनीश सेठ यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश होता. सेठ यांचीच या पदावर वर्णी लागेल असं बोललं जात होतं. ते खरं ठरलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.