Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दारूला पैशासाठी तगादा लावल्याने खून : बिहारी तरूणास अटक

दारूला पैशासाठी तगादा लावल्याने खून : बिहारी तरूणास अटक



सांगली : खरा पंचनामा

दारू पिण्यासाठी वारंवार पैशाचा तगादा लावत झालेल्या वादातून संजयनगर येथील नितीन शिंदे (वय ३६) याचा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी बिहारी तरूणास संजयनगर पोलिसांनी अटक केली. त्याला 6 दिवस पोलिस कोठडित ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नागेंद्र भोला राम (वय २०, रा. झेंडा चौक, मूळ रा. गोपालगंज, गोपालपूर, बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नितीन शिंदे संजयनगर येथील खेराडकर पेट्रोलपंपाजवळील झेंडा चौकात राहण्यास आहे. काल नितीन कामावरून परतल्यानंतर सायंकाळी घराबाहेर पडला होता. त्यावेळी तो नागेंद्र राम याच्या खोलीत गेला. त्याला दारूसाठी उसने पैसे मागू लागला. पैसे देण्यास नकार दिल्याने जोरदार वाद झाला. 

त्यानंतर पुन्हा सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने पैशांसाठी पुन्हा तगादा लावत त्रास देण्यास सुरूवात केली. वाद टोकाला गेल्यानंतर नागेंद्र राम याने घरातील गॅस स्टोव्ह उचलून नितीनच्या डोक्यात घातला. एकच वर्मी घाव बसल्याने नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला. अतिरक्तस्राव झाल्याने नितीनचा जागीच मृत्यू झाला. संजयनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या प्राथमिक माहिती आधारे तातडीने नागेंद्र राम याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे.

दरम्यान, संशयित नागेंद्र या मूळचा बिहारचा असून तो चिंतामणी मोटर्स येथे कामाला होता. मृत नितीन आणि त्याची ओळख होती. नितीन हा वारंवार त्याच्याकडे पैशांसाठी तगादाला लावत होता. घटनेदिवशी दुपारीही त्याच्यात याच कारणातून वाद झाला होता. त्यानंतर सायंकाळी नागेंद्र याचे काही मित्र त्याठिकाणी आले होते. त्यावेळीही वाद झाला होता. अखेर रोजच्या त्रासाला कंटाळून नागेंद्र याने हा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

दरम्यान अल्पवयीन मुलाचा विनयभंग केल्याप्रकरणी मृत नितीन शिंदे यास तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा काही महिन्यांपुर्वी सुनावली होती. सध्या ही बाब न्यायप्रविष्ठ आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.