Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त चार घरफोड्या उघडकीस : सांगली एलसीबीची कारवाई

सांगलीत दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
चार घरफोड्या उघडकीस : सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली, मिरजेतील चार घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश एलसीबीला यश आले. याप्रकरणी दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मारूती कार, रोकड, घरफोडीचे साहित्य असा २४ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

कैलास चिंतामण मोरे (वय ४३, रा. सोनगीर, जि. धुळे), जयप्रकाश राजाराम यादव (वय ३५, रा. सोनगीर, जि. धुळे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चोरीतील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते. त्यानुसार पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत होते. त्यावेळी तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर एका विना क्रमांकाच्या कारमधून संशयित येणार असल्याची माहिती मिळाली होती. 

पथकाने त्यानुसार तेथे सापळा रचला होता. पथकाला तेथे गस्त घालताना एक विना क्रमांकाची मारूती कार रस्त्याकडेला उभी असल्याचे दिसले. पथकाला संशय आल्याने तेथे जाऊन दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. कारमधील दोघांना ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये एका बॅगमध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगलीतील विश्रामबाग, संजयनगर तसेच मिरजेत दिवसा घरफोडी करून तेथून ते दागिने लंपास केल्याची कबुली दिली. त्यानंतर कारसह मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. त्यांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, श्री. चंदनशिवे, बिरोबा नरळे, संदीप नलावडे, सागर लवटे, संदीप गुरव, अमर नरळे, मच्छिंद्र बर्डे, प्रकाश पाटील, उदयसिंह माळी, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.