ज्येष्ठ पत्रकार जे. के. बसुगडे यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार
जयसिंगपूर : खरा पंचनामा
जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचतर्फे नुकताच विविध मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात गेल्या ३५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार जे. के. बसुगडे (सर) यांचा माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी मंत्री, माजी आमदार देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचची लक्ष्मीकांत ऊर्फ बंडा मणियार यांनी स्थापना केली आहे. या विचारमंचतर्फे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षीही मंचतर्फे विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यंदा पुरस्कार वितरण सोहळ्याचे १६ वर्ष होते.
या कार्यक्रमात गेली ३५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार जे. के. बसुगडे (सर) यांचा माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शिवाय नृसिंहवाडी येथील पत्रकार विनोद पुजारी यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास इंद्रजित देशमुख, आप्पासाहेब खोत, कवि अशोक नायगावकर, गोवर्धन दबडे, बाळासाहेब परीट, सुरेश कुराडे, प्रताप नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.