राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ एमपीएससीचे अध्यक्ष!
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर यांची सेवानिवृतती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिकामेच होते. अखेर, राज्य सरकारने MPSC च्या अध्यक्षपदी नवीन नियुक्ती केली आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांची राज्याचे पोलीस महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, आता त्यांच्याकडे ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात असून लवकरच रजनीश सेठ यांची या पदावर नियुक्ती होऊ शकते, अशी चर्चा होती.
एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा रजनीश सेठ यांनीही अर्ज केला होता. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून तीन नावांची यादी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठविली. या तिघांमध्ये रजनीश सेठ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली होती. यात सेठ यांचे नाव आघाडीवर होतं. अखेर लोकमतच्या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, यापूर्वीचे MPSC चे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर सेवानिवृत्त झाले आहेत. ते नोव्हेंबर २०२१ मध्ये या पदावर रुजू झाले होते. त्यावेळी, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तशी अधिसूचना काढली होती. आयोगाला पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
त्यानंतर, राज्य सरकारने किशोर राजे निंबाळकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानुसार, त्यांचा कार्यकाळ हा पदभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षासाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी निश्चित झाला होता. अधिसूचनेत तसे नमूद करण्यात आले आहे. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर हे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी होते. मात्र, सेवा निवृत्त झाल्यामुळे पुन्हा ते पद रिकामे झाले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.