राष्ट्रवादीकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली असून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांना द्याव्यात, असं त्यात म्हटलं आहे. तर दुसऱ्या गटाला पुन्हा नव्या तारखेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबद्दल होणाऱ्या या निवडणूक आयोग सुनावणीदरम्यान शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करतील तर अजित पवार गटाचा युक्तीवाद नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह करतील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. दुपारी ३ वाजता होणाऱ्या या सुनावणीसाठी शरद पवार खुद्द उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह कोणत्या गटाला मिळणार यावर सुनावणी होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.