त्या पोलिस निरिक्षकाला अटक करून न्यायालयात हजर करा!
पुणे : खरा पंचनामा
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात 2013 मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात साक्ष नोंदवण्यासाठी वारंवार बोलावूनही न्यायालयात हजर न राहिलेल्या तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. डी. कांबळे यांना अटक करुन न्यायालयात हजर करा, असे आदेश शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांनी दिले आहेत.
20 मे 2013 रोजी हानिफ गुलामअली सोमजी (रा. बोट क्लब रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार शिवाजी कांतीलाल शिंदे, साईनाथ निवृत्ती सातव, सोमनाथ काळूराम सातव, विष्णू बाजीराव सातव, ज्ञानेश्वर किसन सातव, निळाराम शितकल (सर्व रा. केसनंद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण करून प्रत्येकी रुपये वीस लाख रुपयांची खंडणी मागणे, फिर्यादी यांच्या कार्यालयात प्रवेश करणे, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सोमजी यांनी फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणी कोरेगाव लिसांनी तपास करून 24 सप्टेंबर 2013 न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याची सुनावणी 27 जानेवारी 2017 रोजी सुरु झाली. आरोपींच्या वतीने अॅड. मिलिंद पवार. ॲड. आकाश देशमुख हे खटल्याचे काम पाहात आहेत. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने साक्षीदारांची साक्ष नोंदवली. परंतु 2019 पासून या खटल्याचे तपास अधिकारी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. डी. काबळे यांची साक्ष नोंदवण्यात आली नाही.
यासंदर्भात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने न्यायालयात अहवाल सादर केला. यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच त्यांच्याद्ध तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. डी. कांबळे पकड वॉरंट बजाविण्यात आले होते. हे पकड वॉरंट त्यांच्या मोबाईलवर पाठवले होते.
हे पकड वॉरंट त्यांच्या मोबाईलवर पाठवले होते. परंतु त्यालाही कांबळे यांनी प्रतिसाद दिला नाही, असे पोलीस कर्मचाऱ्याने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले होते. संबंधित अहवाल न्यायालयात सादर झाल्यानंतर सरकारी वकिलांनी न्यायालयात अर्ज केला.
कांबळे यांना पकडून आणण्यासाठी पकड वॉरंट काढण्यासाठी विनंती केली. न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांनी पुन्हा जामीनपात्र वॉरंट काढले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.