पोलिसांनो, स्वतः हेल्मेट वापरायला सुरूवात करा!
रवींद्र कुमार सिंगल
सांगली : खरा पंचनामा
रस्ते अपघातातील मृत्यूंची संख्या वाढत चालली आहे. ७४ टक्के अपघातात नियमांचे उल्लंघन व सुरक्षिततेची साधने न वापरल्याने प्राण गमवावे लागतात. म्हणून पोलिसानो स्वतः हेल्मटसह सुरक्षिततेची साधने आणि नियमांचे पालन करण्यास सुरूवात करा, असे आवाहन अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) रवींद्र कुमार सिंगल यांनी केले.
श्री. सिंगल हे गेल्या तीन दिवसांपासून सांगली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वाहतूक पोलिसांनी संवाद साधला. अगदी आपुलकीने प्रत्येकाची विचारपूस केली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधवयांच्यासह अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. श्री. सिंगल म्हणाले,‘‘ वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणाऱ्यांनीच काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. त्यानंतर नागरीकांशी सुसंवाद ठेवावा. शाळा, महाविद्यालयात जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. त्यांना वाहतूक नियमांची ओळख करून द्यावी. विद्यार्थी दशेतच त्यांना सवय लागली, तर भविष्यातील अपघात टळतील.
वाहतूक पोलिस हा महत्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. अपघातग्रस्त रुग्णाला तातडीने रुग्णसेवा देण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहन द्यावा. त्यांच्या मनातील पोलिसांविषयीचा गैरसमज दूर व्हायला हवा. असे केल्याने शेकडो लोक तुमच्या मदतीला जोडले जातील. तुमच्या कामाचे कौतुक जनताच करेल, असे काम करा.’’
जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. वाहतूक शाखेशी समन्वय असणाऱ्या सीसीटीव्ही कक्षासही त्यांनी यावेळी भेट दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.