Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अपहरण करून खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना अटक सांगली शहर पोलिसांची कारवाई

अपहरण करून खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना अटक
सांगली शहर पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

मुलीला त्रास देतो या गैरसमजातून तरूणाचे अपहरण करून त्याच्यावर काठी, रॉड, चाकूने खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना ४ तासांत अटक करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली. 

वैभव नंदकुमार साळसकर (वय ३०, गवळी गल्ली, सांगली), युवराज सदाशिव जाधव (वय ३७, रा. सांगलीवाडी), आकाश सुभाष घबाडे (वय २२, रा. सांगलीवाडी), अथर्व ऊर्फ बबलू विजय वायदंडे (वय ३७, रा. सांगलीवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मच्छिंद्र शिवाजी खरजे (वय २१, रा. सांगलीवाडी, मूळ रा. पडळकरवाडी, ता. सांगोला) याने फिर्याद दिली आहे. शनिवार दि. १४ रोजी मच्छिंद्र माल उतरण्यासाठी शंभर फुटी रस्त्यावरील एका प्लायवूडच्या दुकानात आला होता. तो संशयितांपैकी एकाच्या मुलीला त्रास देतो असा संशय होता. त्या रागातून संशयितांनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून सांगलीवाडी येथील बायपास रस्त्यावर नेले. 

तेथे त्याला काठी, रॉड, चाकूने मारहाण करण्यात आली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर संशयित पसार झाले होते. याबाबत मच्छिंद्र याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर यातील संशयितांना तातडीने अटक करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने मच्छिंद्र याच्याकडे चौकशी केल्यानंतर चारही संशयितांना अवघ्या चार तासात अटक केली.  

पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिवानंद कुंभार, उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, श्रीपाद शिंदे, सचिन शिंदे, संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, संतोष गळवे, गौतम कांबळे, गणेश कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.