हमास-इस्रायल संघर्षावर भारताने स्पष्ट केली भूमिका
नवी दिल्ली : खरा पंचनामा
गेले चार दिवसांपासून हमास आणि इस्रायलमध्ये संघर्ष पेटला आहे. अनेक देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेने या हल्ल्याचा निषेध करत, इस्रायला पाठींबा दिला आहे.
दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हमास- इस्रायल संघर्षावर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. या संदर्भातील माहिती पीएम मोदी यांनी त्यांच्या अधिकृत X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे.
पीएम मोदी यांनी x वरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचे माझ्या फोनला प्रतिसाद देत इस्रायलमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीबद्दल माहिती दिल्याबद्दल आभार मानतो. इस्रायलच्या या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटीकरणाचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो, असेही पीएम मोदी यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.