राहुल गांधी एक दिवस देशाचे नेतृत्व करतील!
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विषयी प्रशंसोद्गार काढले. भारत जोडो यात्रेनंतर राहुल यांना गांभीर्याने घेतले जाऊ लागले आहे. ते एक दिवस देशाचे नेतृत्व करतील, असे भाकित पवार यांनी केले.
विरोधी पक्षांनी एकत्र येत देश पातळीवर इंडिया या नावाने आघाडी स्थापन केली आहे. त्या आघाडीतील घटक पक्ष मनाने जवळ आल्याच्या बाबीवर पवार यांनी राहुल यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने शिक्कामोर्तब केले.
मी भाजपशी हातमिळवणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजप समवेत गेलेल्यांचा राष्ट्रवादीशी संबंध नाही. तपास यंत्रणांच्या भीतीमुळे त्यांनी तसे केले, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. आपचे खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली.
केंद्रीय यंत्रणेच्या त्या कारवाईमुळे इंडिया आणखीच मजबूत बनेल, असे त्यांनी म्हटले. पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी महाराष्ट्रात सरकार स्थापन करेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.