Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्यास ३ वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्यास ३ वर्षे सश्रम कारावास



सांगली : खरा पंचनामा

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेसह आरोपीला २५ हजार रूपये दंड, दंड न दिल्यास ४ महीने कारावास, पोक्सो कायद्यानुसार १ वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंड, दंड न दिल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. यातील २५ हजार रूपये पीडित मुलाला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले. 

निलेश तानाजी भोसले (वय २९, रा. कुंभार गल्ली, म्हैसाळ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २०२१ मध्ये आरोपी भोसले याने पीडीतांच्या अल्पवयीन मुलाच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्याला घरी बोलावून त्याच्याशी अश्लील कृत्य केले. याची माहिती पीडित मुलाने आईला दिल्यानंतर त्याच्या आईने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्याचा तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक पी. सी. बाबर यांनी केला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा, पीडित मुलाचा, त्याच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवला. त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी, पुरावे तसेच सरकारी वकिलांच्या युक्तीवादानंतर न्या. हातरोटे यांनी भोसले याला दोषी धरून शिक्षा सुनावली. 

या खटल्यात हवालदार विजय साळुंखे, रेखा खोत तसेच पैरवी कक्षातील पोलिसांची सकार्य मिळाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.