अशोकराव मासाळे यांना राज्यस्तरीय गुरुवर्य समाजरत्न पुरस्कार प्रदान
सांगली : खरा पंचनामा
कॉंग्रेसचे शहर-जिल्हा सरचिटणीस, अण्णा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव मासाळे यांना राज्यस्तरीय गुरुवर्य समाजरत्न पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. रविवारी सांगलीतील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. मासाळे यांनी कॉंग्रेस आणि अण्णा फौंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. टिंबर एरिया, कॉलेज कॉर्नर भीमनगर, संभाजी कॉलनी, शिंदे मळा, रेल्वे स्टेशन परिसर यासह शहरातील विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात मासाळे आघाडीवर असतात. कॉंग्रेस पक्षाच्या विविध कार्यक्रमातून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. गोरगरीबांसाठी कधीही धावून येणारा कार्यकर्ता अशी मासाळे यांची ओळख बनली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठा फौंडेशनतर्फे त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
सांगलीतील प्रसिद्ध धन्वंतरी, कवी डॉ. जयश्री पाटील यांच्याहस्ते श्री. मासाळे यांना मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वैजयंता फौंडेशन महाराष्ट्राच्या अध्यक्षा ज्योती संजयकाका पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सामाजिक कार्यकर्त्या शरयू राजेंद्रसिंह पाटील यांच्यासह विविध मान्यवर, नागरिक, महिला, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. मासाळे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचा विविध संस्थांमार्फत सत्कार करण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.