Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लेखी आश्वासन आणि थेट फोन, फडणवीसांच्या आश्वासनानंतर सुमन पाटील, रोहित पाटलांचं उपोषण स्थगित !

लेखी आश्वासन आणि थेट फोन, फडणवीसांच्या आश्वासनानंतर सुमन पाटील, रोहित पाटलांचं उपोषण स्थगित !



सांगली : खरा पंचनामा

टेंभू पाणी योजनेच्या विस्तारीकरणासंबंधित राज्य सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित केलं आहे. आश्वासनाप्रमाणे जर एक महिन्यात काम सुरू नाही झालं तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

जेष्ठ स्वातंत्र्यसैनिकाच्या हस्ते सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी उपोषण सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर आणि सांगलीचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.

तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील वंचित गावाच्या पाण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसंबंधित मागण्या मान्य करण्याचं लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करत असल्याचा निर्णय आमदार सुमनताई पाटलांनी जाहीर केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.