Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीने पत्रकारांना बोलावले ढाब्यावर! नेत्यांचा आदेश मानल्याची चर्चा, पत्रकारांच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीने पत्रकारांना बोलावले ढाब्यावर!
नेत्यांचा आदेश मानल्याची चर्चा, पत्रकारांच्या भूमिकेकडे लक्ष



सांगली : खरा पंचनामा

गेल्या काही दिवसांपूर्वी एका राजकीय नेत्याने पत्रकारांनी विरोधात बातम्या देऊ नयेत यासाठी त्यांना चहाला, ढाब्यावर नेण्याचा सल्ला भर सभेत दिला होता. संबंधित नेत्याचा आदेश शिरसावंद्य मानून जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीने पत्रकारांना बुधवारी ढाब्यावर आमंत्रित केले आहे. पत्रकारांचे अवमूल्यन करणाऱ्या नेत्याच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या जेवायला सांगलीतील पत्रकार जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

दोन-दोन पक्ष फोडून त्यांचे आमदार, खासदार फोडूनही एका राजकीय पक्षाला महाराष्ट्रात निवडणुकीत यश मिळेल की नाही याची भीती वाटत आहे. त्यातच आपल्या पक्षाच्या विरोधात माध्यमांतून बातम्या येऊ नयेत यासाठी या राज्य पातळीवरील नेत्याने भर सभेत कार्यकर्त्यांना पत्रकारांना चहाला, ढाब्यावर घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. त्याचे राज्यभर पडसाद उमटले होते. अनेक पत्रकार संघटनांनी याचा विविध मार्गाने जाहीर निषेधही केला होता. 

जाहीर सभेत पत्रकारांचे अवमूल्यन करणाऱ्या या नेत्यासह त्याच्या पक्षातील नेत्यांच्या ढाब्यांवरील पत्रकार परिषदेस उपस्थित न राहण्याचा निर्णय अनेक पत्रकार संघटनांनी घेतला होता. या राज्य पातळीवरील नेत्याचा नुकताचा सांगली, कोल्हापूर दौराही झाला. त्यानंतर आता त्या नेत्याच्या पक्षातील एका लोकप्रतिनिधीने बुधवारी सांगलीतील पत्रकारांना ढाब्यावर आमंत्रित केले आहे. याची सांगलीसह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे उद्या या लोकप्रतिनिधीच्या ढाब्यावरील आमंत्रण स्विकारून सांगलीतील पत्रकार जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.