शरद पवार गटाकडून नऊ हजार शपथपत्र दाखल, निवडणूक आयोगात उद्या दुपारी घमासान
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राष्ट्रवादी फुटीसंदर्भात 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगात उद्या दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. शरद पवार गटाकडून तब्बल आठ ते नऊ हजार शपथपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचा वाद संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर आता उद्यापासून अजून एक वेगळी लढाई सुरू होणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबत पहिली सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून या सगळ्या संदर्भात तयारी करण्यात आली आहे. आज शरद पवार गटाकडनं दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये कार्य समितीची एक बैठक सुद्धा बोलवण्यात आलेली आहे. निवडणूक चिन्ह गोठवलं गेलं किंवा जर आपल्या विरोधात निर्णय आला त्याचे काय विपरीत परिणाम होणार? पुढे नेमके कोणते पाऊल उचलायचे हाच या बैठकीचा अजेंडा हा असणार आहे.
दरम्यान शरद पवार गटाकडून जवळपास आठ ते नऊ हजार कागदपत्र म्हणजे शपथपत्र दाखल करण्यात आली हे. शरद पवार गटाचा दावा आहे की, अजित पवार गटापेक्षा कागदपत्रांची संख्या जास्त आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.