Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा आरक्षणसाठी भाजप प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांचा राजीनामा!

मराठा आरक्षणसाठी भाजप प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांचा राजीनामा!



पिंपरी : खरा पंचनामा

भाजपला मोठा धक्का बसला असून प्रदेश प्रवक्ते आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, पवार हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दसऱ्या दिवशी प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राजीनामा पाठविला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज खूप जड अंत:करणाने मी हा निर्णय घेत आहे.

गेली ५० वर्षे ज्या पक्षात काम केले, घडलो त्या भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देत आहे. गेली अनेक वर्षे राज्यातील मराठा बांधव आरक्षण मागत असताना त्यांना हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही. समाज अत्यंत आशेने या सरकारकडे पाहत असताना देखील केवळ वेळकाढूपणा सुरू आहे. त्या सरकारच्या पक्षात शांत बसून राहण्यापेक्षा माझ्या भाजपा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत असून आजपासून मी पक्षापासून मुक्त होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.