Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा समाजाचा दणका..! परभणीत तब्बल १५५ उमेदवार रिंगणात, निवडणुक आयोगाने रद्द केली निवडणुक

मराठा समाजाचा दणका..! परभणीत तब्बल १५५ उमेदवार रिंगणात, निवडणुक आयोगाने रद्द केली निवडणुक



परभणी : खरा पंचनामा

मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करण्यात येत आहे. तर अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे.

याचाच फटका निवडणुक आयोगाला बसला आहे. एका जागेसाठी पिंपळगाव येथील पोटनिवडणुकीसाठी निवडणुक होणार होती, मात्र या निवडणुकीसाठी तब्बल १५५ महिलांनी अर्ज केल्याने निवडणुक आयोगाने पोटनिवडणुकच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याची चर्चा आता सर्वदूर पोहचली आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथे एका जागेसाठी पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र या निवडणुकीसाठी तब्बल १५५ महिलांनी अर्ज केल्याने निवडणुक आयोगाने पोटनिवडणुकच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण एका बॅलेट मशीनवर १४ उमेदवार असतात. अशा चार बॅलेट मशीन मतदान केंद्रावर लावू शकतो. मात्र १५५ उमेदवारांसाठी बॅलेट मशीन लावू शकत नसल्याचं म्हणत निवडणुक आयोगाने जिल्ह्याध्यक्षांना पत्र पाठवून निवडणुक रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. परंतु या गावात अशा पद्धतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने याची चर्चा सुरू आहे. यातच मराठा समाजाला आरक्षण दिला नाही तर येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत देखील अशा पद्धतीने अर्ज सादर करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.