जितेंद्र आव्हाडांच्या 'अश्रूं'वर अजितदादांचा पलटवार!
नाशीक : खरा पंचनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांच्याकडून केल्या गेलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे, तसंच निवडणूक आयोगात शुक्रवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या सुनावणीवरही अजित पवार बोलले आहेत.
'कुणी काय टीका करावी, हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललोय. एक नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून काम करावं लागतं. महाराष्ट्र कसा असावा आणि राजकीय लोकांनी कसं वागावं, कमरेखालचे वार कधीच करायचे नाहीत, हे चव्हाण साहेबांनी सांगितलं आहे. शरद पवार साहेबांनी सांगितलं माझा फोटो वापरू नका, म्हणून चव्हाण साहेबांचा फोटो वापरला ते आम्हाला नाही म्हणणार नाही,' असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला.
निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी शरद पवारांना हुकूमशाह म्हणलं गेलं, त्यावेळी आपल्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वेदना आणि जितेंद्र आव्हाड कुठे जुळतं का? असा निशाणा अजित पवारांनी साधला.
संजय राऊतांनाही प्रत्युत्तर देवेंद्र डमरू वाजवत आहेत आणि दोन बंदरं नाचत आहेत, दुसरं यांच्या हातात आहे काय? अशी टीका संजय राऊतांनी केली होती. संजय राऊतांच्या या टीकेलाही अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोठ्या माणसांबद्दल काय बोलणार, असा टोला अजित पवारांनी लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.