करसल्लागार महिलेला चेन स्नॅचिंगचा फटका!
दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी लांबवली चेन
सांगली : खरा पंचनामा
विश्रामबाग परिसरातील गुलमोहर कॉलनीत दुचाकीवरून निघालेल्या कर सल्लागार महिलेला चेन स्नॅचिंगचा फटका बसला. दुचाकीवरुन आलेल्या दोघानी त्यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसडा मारून लंपास केली. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास नक्षत्र अपार्टमेंट येथे ही घटना घडली.
याप्रकरणी स्वाती अनिल जोशी (वय ५८ रा. विश्रामबाग, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्वाती जोशी या कर सल्लागार आहे. खरे मंगल कार्यालय शेजारी असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये राहतात. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांच्या मोपेडवरून गुलमोहर कॉलनी येथील मालू हायस्कुलच्या पाठीमागे राहत असलेल्या त्यांच्या मामाच्या घरी निघाल्या होत्या. जोशी या गुलमोहर कॉलनीतील नक्षत्र अपार्टमेंटजवळ आल्या असता दुचाकीवरून हेल्मेट घालून दोन चोरटे त्यांच्या जवळ आले.
दोघांपैकी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने जोशी यांच्या गळ्यात असलेली २ तोळे २ ग्रॅम वजनाची ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसडा मारून लांबवली आणि दोघांनी पलायन केले. अचानक घडलेल्या या घटनेने जोशी या गोंधळल्या. आरडाओरडा केला, मात्र चोरटे पसार झाले. यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.