Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा, 'ती' नोटीस अखेर रद्द

रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा, 'ती' नोटीस अखेर रद्द



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीला नोटीस पाठवली होती.

या नोटीसमध्ये पुढच्या 72 तासांत बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानोटीसच्या विरोधात रोहित पवार यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. याच प्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने दिलेल्या नोटीसच्या विरोधात रोहित पवारांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई हाटकोर्टाने रोहित पवार यांना दिलासा दिला. एमपीसीबीची नोटीस हायकोर्टाने रद्द केली आहे. न्यायमुर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. एमपीसीबीने पुन्हा एकदा इन्स्पेक्शन करून जे आक्षेप असतील त्यावर नवी नोटीस जारी करा. बारामती अॅग्रोला नव्या नोटीसीवर उत्तर देण्यासाठी 15 दिवस मुदत द्या. खुलासा समाधानकारक नसेल तर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा मार्ग मोकळा. मात्र, बाजू नं ऐकता एकतर्फी कारवाई अमान्य, असा निर्णय हायकोर्टाने दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.