कपडे धुण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू
सांगली : खरा पंचनामा
सांगली येथील कवठेमहाकाळ येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. दसरा सण येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने घरचे कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या बाप- लेकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. या घटनेमुळे गावांवर शोककळा पसरली आहे.
राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ४८) व त्यांचा मुलगा राजेंद्र चव्हाण (वय १८, रा. दोघेही करोली टी, ता. कवठेमहांकाळ) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या बापलेकाचे नाव आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दसरा जवळ आल्याने राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण हे त्यांचा मुलगा कार्तिक सोबत घरातील धुणी धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात रविवारी गेले होते. धुणे धूत असताना ते पाय घसरून पाण्यात पडले. दरम्यान, त्यांचा मुलगा देखील त्यांना वाचवण्यासाठी तलावात उतरला. दोघांनाही पोहता येत असल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तलावालगतच्या ग्रामस्थांना तलावाच्या काठावर कपडे दिसले. मात्र, कोणी जवळपास नसल्याने त्यांना संशय आला.
यावेळी त्यांनी तलाव परिसरात पाहणी केली असता, दोघा बापलेकांचे मृतदेह दिसले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. रात्री दहाच्या सुमारास मृतदेह कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.