पोरखेळ करताय का? विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सुनावले..
दिल्ली : खरा पंचनामा
शिवसेनेच्या आमदार अपात्रता कारवाईप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांच्या कामकाजावर तीव्र नापसंती व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षांनी दिलेले वेळापत्रक अमान्य असून मंगळवारपर्यंत यासदंर्भातील सुधारीत वेळापत्रक व दोन महिन्याच्या आत निर्णय द्या, अन्यथा आम्ही आदेश देऊ असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश आज संतप्त झाल्याचे सुनावणीदरम्यान दिसून आल्याचे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी माध्यमांना सांगितले. खुद्द ॲड. सिध्दार्थ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात सरन्यायाधिश एवढे संतप्त कधीच झाले नव्हते असे नमूद केले. दरम्यान विधानसभा अध्यक्षांना कायदा समजत नसेल, तर त्यांना कायदा बसून समजावा लागेल असे न्यायालयाने फटकारले.
या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालय गंभीरपणे पाहत असून तुम्ही सर्वोच्च न्यायालयाची अवहेलना करीत आहात हे लक्षात घ्यावे अशा शब्दांत न्यायालयाने नार्वेकरांना फटकारले. न्यायालयाने स्पष्ट केले की, विधानसभा अध्यक्षांनी दिलेले वेळापत्रक मान्य नसून मंगळवारपर्यंत नवे वेळापत्रक द्या. हा पोरखेळ सुरू आहे. जर वेळापत्रक निश्चित होत नसेल, तर आम्हाला दोन महिन्यांचा कालावधी नाईलाजास्तव द्यावा लागेल, तुम्ही निवडणूकीसाठी थांबला आहात का? अशी विचारणाही न्यायालयाने केली.
दरम्यान फक्त शिवसेनेसाठीच नव्हे तर राष्ट्रवादीच्या आमदारांसाठीही सेच वेळापत्रक देण्याचे आदेश न्यायालयाने दिले, विधानसभा अध्यक्षांचे वकील तुषार मेहता यांनी आम्ही मंगळवारपर्यंत नवीन वेळापत्रक आणू असे सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.