Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत दोन दुचाकी चोरट्यांना अटक २.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसांची कारवाई

सांगलीत दोन दुचाकी चोरट्यांना अटक
२.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली. 

गणेश शिवाजी गोसावी (वय ३५, रा. रामनगर, सांगली), समीर राजा देसाई (वय २३, रा. जवाहर नगर, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दुचाकी चोरीतील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक श्री. देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.  

बुधवारी पथकाला सांगलीतील शामरावनगर येथील झुलेलाल मंदिराजवळ एकजण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी थांबला असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून गणेश गोसावी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीच्या दुचाकी घराजवळ उभ्या केल्याचे सांगितले. त्या त्याने सांगलीतील संजयनगर, हालोंडी (जि. कोल्हापूर), कराड, जयसिंगपूर येथून चोरल्याची कबुली दिली. तसेच इचलकरंजी येथील समीर देसाईने याने सांगलीतून दुचाकी चोरल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही अटक करून दुचाकी जप्त करण्यात आली. पोलिसांनी दोघांकडून सहा दुचाकी, एक मोबाईल असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, श्रीपाद शिंदे, सचिन शिंदे, गुंडोपंत दोरकर, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, गणेश कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.