मराठा आरक्षण; संदिप शिंदे समितीने मागितला आणखी दोन महिन्यांचा वेळ
मुंबई : खरा पंचनामा
मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केलेल्या संदिप शिंदे समितीने आणखी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. काही पुरावे गोळा करण्यासाठी हा वेळ मागण्यात आल्याचं समजतं. सरकारने समितीला वेळ देण्याबाबत अद्याप काही निर्णय घेतला नसल्याची माहिती आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने दोन महिन्यांचा कालावधी मागितला आहे. आणखी काही पुरावे आणि कागदपत्रं गोळा करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे समितीने आणखी दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्यानंतरल अहवाल सादर करण्यात येईल, असं समितीकडून सांगण्यात आलं आहे.
सरकारने समितीला वेळ देण्याबाबत काही निर्णय घेतलेला नाही. पण, समितीने वेळ मागितला आहे. सरकारने वेळ देऊ केल्यास अहवाल यायला डिसेंबर उजाडणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन वातावरण तापवलं आहे. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम २४ तारखेला संपणार आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.