त्यावेळी अदृश्य शक्ती ढवळाढवळ करतेय काय हे कळेल!
पिंपरी : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार यांचाच आहे. पक्षाची पायाभरणी त्यांनी केली आहे. देशातील बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे वेगळा निर्णय होणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. त्यातूनही आयोगाने वेगळा निर्णय घेतल्यास अदृश्य शक्ती ढवळाढवळ करतेय काय हे कळेल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असताना पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. सोमवारी दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार यांचाच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची या प्रश्नाला काही अर्थ नाही. याबाबत कोणालाही विचारले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा आहे, असे सांगितले जाईल. निवडणूक आयोगात निर्णय लागल्यावरच अदृश्य शक्ती ढवळाढवळ करतेय का हे कळेल.
शरद पवारांनी काढलेला हा पक्ष आहे. पक्षाची पायाभरणी त्यांनी केली आहे. देशातील बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे वेगळा निर्णय होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. त्यातूनच निवडणूक आयोगाला काही वेगळे करण्याची वेळ आली, तर हे दुर्दैव आहे. शिवसेनेच्या बाबतीत दुर्देवी घडले आहे. पक्ष चोरीला जाऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. या देशात पक्ष चोरीला जायला लागले तर लोकशाहीच धोक्यात येईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय द्यावा, असेही पाटील म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.