गुंड सचिन डोंगरेसह अकरा जणांचा पुन्हा ताबा!
नालसाब मुल्ला खून प्रकरण : ‘मोका’ अंतर्गत कारवाई
सांगली : खरा पंचनामा
बाबा ग्रुपचा प्रमुख आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याच्या खूनातील मुख्य सुत्रधार सराईत गुंड सचिन डोंगरे याच्यासह अकरा जणांचा पुन्हा न्यायालयीन कोठडीतून ताबा घेण्यात आला. एक महिन्यापुर्वीच या टोळीवर मोकातंर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यात कवठेमहांकाळ तालुक्यातील सहा जणांचा त्यात समावेश आहे.
स्वप्नील मलमे (रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ), सनी कुरणे (शाहुनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), विशाल कोळपे (लिंबेवाडी, रांजणी, ता. कवठेमहांकाळ), सचिन डोंगरे (गुलाब कॉलनी, शंभर फुटी रस्ता, सांगली), प्रशांत उर्फ बबलू चव्हाण, रोहित मंडले (दोघे रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ), ऋतिक माने (कोकळे, ता. कवठेमहांकाळ), विक्रम घागरे (ढालगाव, ता. कवठेमहांकाळ), प्रविण बाबर (रा. आलेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर), अक्षय शेंडगे (रा. कलानगर, सांगली), अवधुत पानबुडे (रा. नळभाग सांगली) या अकरा जणांना सांगली पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे.
नालसाब मुल्ला याचा खून कळंबा कारागृहात असलेल्या जॉय ग्रुपचा प्रमुख सचिन डोंगरे याच्या सांगण्यावरून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. एकेकाळी नालसाबचा साथीदार असलेला डोंगरे याच्यावर मोक्कातंर्गत सन २०१९ साली कारवाई करण्यात आली होती. त्यातून जामिन मिळवण्यासाठी नालसाब मदत करत नसल्याच्या रागातून डोंगरे याच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिली होती. पोलिसांनी अकरा जणांना अटक केली होती.
टोळीवर अनेक स्वरुपाचे गुन्हे असल्यामुळे त्यांच्यावर मोकातंर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली पाठवला होता. या टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी हा प्रस्तावास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुनील फुलारी तातडीने मंजूरी दिली. त्यानंतर हा तपास उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार जाधव यांनी पुन्हा न्यायालयाच्या परवानगीने ताबा घेतला आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असते १८ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.