अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला चेन्नइतुन अटक
मुंबई : खरा पंचनामा
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला चेन्नइतुन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी केली आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याने ससून हॉस्पिटलमधून पलायन केले होते.
त्यानंतर या प्रकरणाची खूप चर्चा झाली. राजकीय नेत्यांनी या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप केली. पुणे पोलिसांनी ललित अनिल पाटील याचा भाऊ भूषण अनिल पाटील आणि अभिषेक विलास बलकवडे यांना नेपाळ बॉर्डरवरून अटक केली होती. मुंबई पोलिसांनी अखेर ललित पाटील याला चेन्नइतुन अटक केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.