नोकरीच्या आमिषाने ८७ लाखांचा गंडा; दोघांवर गुन्हा
सांगली : खरा पंचनामा
शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सहा जणांना तब्बल ८६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ शंकर पाटील (वय ३०) आणि त्याचे वडिल शंकर रामचंद्र पाटील (वय ६० रा. विठाईनगर, बालाजीनगर सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी अभिषेक पांडुरंग खंडागळे (रा. रुक्मिणी निवास, प्लॉट नं. २५, गुलमोहर कॉलनी, सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयीत दोघांनी, आमच्या वरिष्ठापर्यत ओळखी असून तुम्हाला शासकीय नोकरी लावून देतो असे सांगून सहा जणांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ८६ लाख ९० हजार रुपये उकळले. फसवणूक झालेल्यांमध्ये पौर्णिमा तुषार पवार, पूजा झेंडे (रा. झेंडे गल्ली, कवलापूर), संग्राम वसंतराव सोनवणे (रा. वल्लभनगर, पुणे), विनायक उदय नागावे, शुभम उदय नागावे, महेश पाटील यांचा समावेश आहे. हा प्रकार दि. ५ मार्च २०१५ ते दि. ४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला.
संशयीतांनी सहा जणांकडून ऑनलाईन तसेच आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे घेतले. मात्र कोणालाच नोकरी न लागल्याने फसवणूक झाल्याचे सहा जणांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेले पैसे परत मागितले असता संशयीतांनी संबंधितांना शिवीगाळ तसेच दमदाटी केली. त्यामुळे अभिषेक खंडागळे यांनी फिर्याद दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.