Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चार अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक, ५ दुचाकी जप्त तीन दिवसांत कुरूंदवाड पोलिसांची कारवाई; सर्व संशयित इचलकरंजीचे

चार अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक, ५ दुचाकी जप्त
तीन दिवसांत कुरूंदवाड पोलिसांची कारवाई; सर्व संशयित इचलकरंजीचे



शिरोळ : खरा पंचनामा

कुरुंदवाडसह इचलकरंजी परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली. गुन्हा घडल्यापासून तीन दिवसांत तो उघडकीस आणण्यात आला. त्यांच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती कुरुंदवाडचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली. 

शुभम संजय कोणे (वय २४), विशाल नरसिंग जाधव (वय २१), अर्जुन महेश निवाते (वय २२), चैतन्य ऊर्फ गणेश जेटाप्पा माळी (वय २३, सर्व रा. इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. औरवाड (ता. शिरोळ) येथून दि. २५ रोजी सकाळी एक दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद कुरूंदवाड पोलिस ठाण्यात इरफान करीमखान यांनी दिली होती. त्यानंतर सहायक निरीक्षक फडणीस यांनी या गुन्ह्याचा तातडीने शोध लावण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले होते. 

शुक्रवारी शिरढोण फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी दोघेजण बुलेटवरून तेथे आले. पोलिसांना पाहून मागे बसलेल्याने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी ती बुलेट चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी औरवाड, कुरूंदवाड, इचलकरंजी येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या साथीदारांना अटक करून चोरीच्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या. 

कुरूंदवाडचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर पवार, विवेक कराडे, ज्ञानदेव सानप, राजेंद्र सानप, सागर खाडे, नागेश केरीपाळे, सचिन पुजारी, फारूख जमादार, प्रवीण परीट आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.