भाजपाची चिंता वाढली; आणखी एका पक्षाने एनडीएची साथ सोडली!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकीकडे इंडिया आघाडी भाजपाविरोधात मजबूत होताना दिसतेय तर दुसरीकडे भाजपाप्रणित एनडीएतून एक एक पक्ष बाहेर पडताना दिसत आहेत. आता अभिनेता आणि नेता पवन कल्याणने गुरुवारी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएतून बाहेर पडत टीडीपीचे समर्थन करण्याची घोषणा केली. आंधप्रदेशच्या विकासासाठी जनसेना आणि टीडीपी गरजेची आहे असं त्यांनी म्हटलं.
जनसेना प्रमुख पवन कल्याण म्हणाले की, टीडीपी एक मजबूत पक्ष आहे. आंध्र प्रदेशच्या सुशासन आणि विकासासाठी तेलुगु देशम पार्टीची गरज आहे. आज टीडीपी संघर्ष करत आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या काळात टीडीपीला जनसैनिकांच्या युवकांची गरज आहे. जर टीडीपी आणि जनसेना एकत्र आली तर राज्यात वाएसआरसीपीची सरकार कोसळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर पवन कल्याण आंध्र प्रदेशातील वायएसआर जगमोहन रेड्डी यांच्या सरकारवर नाराज आहेत. जनसेना प्रमुख पवन कल्याण १४ सप्टेंबरला चंद्राबाबू नायडू यांना भेटण्यासाठी राजामुंडरीच्या सेंट्रल जेलला गेले होते. त्यानंतर १८ सप्टेंबरला दिल्लीत आयोजित NDA च्या बैठकीत पवन कल्याण सहभागी झाले होते. आम्ही भाजपाचे समर्थन करू असं त्या बैठकीनंतर पवन कल्याण यांनी म्हटलं होते. ते म्हणाले होते की, एनडीएची बैठक खूप चांगली झाली. या बैठकीत आत्मनिर्भर भारत यावर चर्चा झाली. आमच्या पक्षाकडून मी पंतप्रधान मोदींना आश्वासन दिले की आम्ही तुमच्यासोबत उभे राहू असं त्यांनी सांगितले होते.
पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशात वायएसआरसीपी सरकारविरोधात लढण्यासाठी स्वत:चा पक्ष एनडीए आणि टीडीपी यांना एकत्रित राहण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु आता पवन कल्याण यांनी एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.