Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देशभरातील विविध विमा कंपनीना तब्बल पंधरा हजार कोटीपेक्षा अधिक जीएसटीच्या नोटिसा!

देशभरातील विविध विमा कंपनीना तब्बल पंधरा हजार कोटीपेक्षा अधिक जीएसटीच्या नोटिसा!



कोल्हापूर : खरा पंचनामा

पूर्ण देशभरातील विमा व्यवसाय संबंधित कर चुकवेगिरी संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर कार्यालयाकडून तपास चालू होता.  
ह्या मध्ये बड्या सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या सहित खाजगी विमा कंपनी ही समाविष्ट होत्या. 

जीएसटी गुप्तचर  महासंचालनालय  अर्थात DGGI च्या कोल्हापूर शाखेने ह्या प्रकरणी  तब्बल पंधरा हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या जीएसटी च्या मागणीच्या नोटिसा देशभरातील विविध विमा कंपन्यांना जारी केल्या आहेत.

नोटीस बजावत नमूद करण्यात आलेल्या पंधरा हजार कोटी रुपयांमध्ये व्याज आणि दंड रक्कम जोडून या नोटिसातील रक्कम वाढणार आहे, असेही सूत्रानी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.