2 वरीष्ठ अधिकाऱ्यासह 5 पोलिस
अधिकाऱ्यांच्या बदल्या
उपायुक्त श्रीनिवास घाडगे, संभाजी कदम यांचा समावेश
मुंबई : खरा पंचनामा
राज्य गृह विभागाने सोमवारी सायंकाळी काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे पोलिस आयुक्तालयातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांची पुणे शहरात नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीनिवास घाडगे यांची पोलिस उपायुक्त, पुणे शहर ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. संभाजी सुदाम कदम यांची पोलिस उपायुक्त, अमरावती शहर ते पोलिस उपायुक्त, पुणे शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गणेश शिंदे यांची अप्पर पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे ते पोलिस उपायुक्त, अमरावती शहर येथे बदली करण्यात आली आहे. श्रीकांत धिवरे यांची पोलिस अधीक्षक, लोहमार्ग पुणे ते पोलिस अधीक्षक, धुळे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार दोषी यांची पोलिस अधीक्षक, जालना ते पोलिस अधीक्षक, सीआयडी, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.