Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुम्ही ज्या बांधावर येताय त्याचा 7/12 आमच्या बापाचा!

तुम्ही ज्या बांधावर येताय त्याचा 7/12 आमच्या बापाचा!



लासलगाव : खरा पंचनामा

आज गुरुवार येवला मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर असणार आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्याला त्यांच्याच मतदारसंघातून विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

46 गावांच्या वतीने नामदार भुजबळ यांच्या संभाव्य दौऱ्यात प्रखर विरोध करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता प्रशासन आणि पोलिसांपुढे आजचा दौरा कसा होतो याची चिंता निर्माण झाली आहे. " आमच्या हक्काच्या सातबारावर आपण दौरा करू नये. अशा पोस्टही सोशल मीडीयावर काल रात्रीपासून फिरत आहेत. तसेच एका मराठा बांधवाने भुजबळांना आमच्या गावात येऊ नका, असे फोन करुन सांगितले आहे. त्यासंदर्भातील कथित ऑडिओ क्लीपही फिरत आहे.

गावबंदी करायला महाराष्ट्राचा सात-बारा तुमच्या नावावर आहे काय?, असा प्रश्न केल्याचे स्मरण करून देत, भुजबळसाहेब तुम्ही उद्या ज्या बांधावर येत आहात, त्याचा सात-बारा नक्कीच आमच्या बापाच्या नावावर आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या बांधावर येऊ नका,' असे आवाहन आज भुजबळ यांच्या मतदारसंघातील ४६ गावांच्या प्रतिनिधींनी केल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री ठिकठिकाणी विविध नेते मंडळींनी यांसदर्भात बैठकी घेतल्याचे समजते. दरम्यान या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी विविध नेत्यांची चर्चा करून याबाबत काही सामंजस्य करता येईल का याबाबत चर्चा करताना दिसून आले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.