Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवारांसह कुटुंबियांच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

अजित पवारांसह कुटुंबियांच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...



पुणे : खरा पंचनामा

प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी पवार कुटुंबिय एकत्र आले होते. यावेळी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील हजेरी लावली. कुटुंबियांच्या स्नेहभोजनानंतर अजित पवार हे दिल्लीकडं रवाना झाले.

हा सोहळा उरकल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली, असा सवाल केला. यावर त्यांनी उत्तर दिलं.

प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कुटुंबिय एकत्र आले होते. ही कौटुंबिक भेट होती. यावेळी सहकुटुंब जेवणही झालं. खूप दिवसांनी आम्ही सर्व भावंड एकत्र लो भेटून सर्वांना आनंद वाटला. यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी माहिती शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी दिली होती. हीच माहिती शरद पवार यांनी पुन्हा माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

"आमच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, ही केवळ सदिच्छा भेट होती," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांनी अधिक काही भाष्य करणं टाळलं यावेळी त्यांच्यासोबत कारमध्ये पत्नी प्रतिभा पवार या देखील होत्या. माध्यमांच्या प्रतिनिधींशी अधिक काही न बोलता त्यांनी पुढे जाण पसंद केलं.

पवार कुटुंबियांच्या भेटीपूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या पुण्यातील 'मोदी बाग' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त आणि दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.