Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुषार दोषी यांची पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती

तुषार दोषी यांची पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती



पुणे : खरा पंचनामा

मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी लाठीमाराच्या घटनेनंतर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले अधीक्षक तुषार दोषी यांची पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता त्यांची नियुक्ती पुणे लोहमार्ग येथे करण्यात आलेली आहे. त्याबाबतचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले आहेत.

जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर दोषी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दोषी यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर शासनाने दोषी यांची नियुक्ती सीआयडीमध्ये केली होती. राज्य शासनाने पुर्वी काढलेल्या आदेशात बदल करून तुषार दोषी यांची नियुक्ती पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक म्हणून केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.