Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जनावरांची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर कार घालत तलवारीनं हल्ला!

जनावरांची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर कार घालत तलवारीनं हल्ला!



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

जनावरांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करणाऱ्या आणि त्यानंतर त्यांची कारमध्ये कोंबून तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मात्र, कारवाई दरम्यान आरोपींनी पोलिसाच्या अंगावर कार घलण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. परंतु पोलिसांनी प्रसंगावधान ओळखून वार चुकवल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर येथे सापळा कारवाई दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी इंजेक्शन देऊन आधी जनावरांना बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांची कारमध्ये कोंबून तस्करी सुरू होती. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी सिल्लेखान्यात जनावरे विक्रीसाठी येण्यापूर्वी पथकाने आरोपींना आडवले. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी हल्ला केला.

आरोपींनी पोलिसांच्या अंगावर कार घालत तलवारीने वार केला. परंतु वार चुकवल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी पोलिसांनी जहीर हसरउल्लाह खान, सुलतान मोहम्मद इकबाल पटेल आणि अबू साद अवार कुरेशी यांना अटक केली आहे. तर आफेर कुरेशी हा तलवार घेऊन पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.