गिरगावमध्ये कांद्याच्या शेतातील गांजा जप्त, दोघा भावांना अटक
१३.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त, उमदी पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
जत तालुक्यातील गिरगाव येथील कोतवालवस्ती येथे कांद्याच्या शेतात लावलेली गांजाची झाडे उध्वस्त करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. यामध्ये १३.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
सिकंदर बगसू कोतवाल (वय ५०), उस्मान बगसू कोतवाल (वय ५०, दोघेही रा. कोतवालवस्ती, गिरगाव, ता. जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाची लागवड, विक्री, तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरीष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार सहायक निरीक्षक श्री. शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक अंमली पदार्थ उत्पादक, विक्रेते यांचा शोध घेत होते.
गिरगाव येथील कोतवालस्ती येथे कांद्याच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती सहायक निरीक्षक शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर त्यांनी पथकासह तेथे छापा टाकला. त्यावेळी सिकंदर कोतवाल याच्या शेतात गांजाची सहा ते सात फूट उंचीची झाले आढळली. तसेच सिकंदरचा भाऊ उस्मान याच्या शेतातही गांजाची झाडे आढळली. ती जप्त करण्यात आली. त्याचे वजन केले असता १३७ किलो भरले. त्याची बाजारभावानुसार १३.६८ लाख रूपये किंमत आहे. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.
उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिरीष शिंदे, आप्पासाहेब हाके, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, इंद्रजित गोदे, सोपन भंडे, नितीन खोंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.