Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भुजबळ साहेब थोडं सबुरीने घ्या, अन्यथा... मराठा पदाधिकाऱ्याने सुनावलं

भुजबळ साहेब थोडं सबुरीने घ्या, अन्यथा... मराठा पदाधिकाऱ्याने सुनावलं



पुणे : खरा पंचनामा

सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता या युद्धात मराठा संघटनांनी देखील उडी घेतली आहे. आज मराठा पदाधिकाऱ्यांनी थेट पुण्यातील शासकीय विश्रामगृह गाठून मंत्री छगन भुजबळ यांना चांगलंच सुनावलं आहे.

छगन भुजबळ साहेब थोडं सबुरीने घ्या. आमच्या लेकराबाळांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या आड येऊ नका. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नख लावू नका. अन्यथा या गोष्टी हाताबाहेर जातील, असा इशाराच स्वराज संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव छगन भुजबळ यांना दिला आहे.

इतकंच नाही तर, धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांच्या गाडीजवळ येऊन त्यांना आव्हान दिलं. माझ्यासमोर भुजबळ यांची गाडी उभी आहे, वेळ पडली तर ती फोडून त्यांचा निषेध केला जाऊ शकतो, ओबीसीच्या नेत्यांना विनंती आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नख लावू नका, असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धनंजय जाधव यांच्या इशाऱ्यानंतर ओबीसी बांधव देखील आक्रमक झाले आहेत. आमच्या दैवताला जर कुणी इशारा देत असेल, तर त्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल, असं ओबीसींनी म्हटलं आहे. 

पुण्यातील शासकीय विश्रामगृहात छगन भुजबळ ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत असताना पोलिसांनी धनंजय जाधव यांना आतमध्ये सोडलंच कसं? असा संतप्त सवाल ओबीसी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.