Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक मुख्यमंत्र्याबाबत केलेले 'ते' विधान पडले महागात

ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक
मुख्यमंत्र्याबाबत केलेले 'ते' विधान पडले महागात



मुंबई : खरा पंचनामा

ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. एका सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याने दत्ता दळवी आज सकाळी अटक करण्यात आली आहे.

भांडूप पोलिस स्टेशनबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत पोलिस स्टेशनमध्ये पोहचले आहेत.

भांडूप मध्ये रविवार (दिनांक 26 नोव्हेंबर) शिवसेना ठाकरे गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर, उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आपत्तीजनक वक्तव्य केले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुहृदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केले होते.

याप्रकरणी भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. भा.द.वि कलम 153 (अ),153 (ब), 153 (अ) (1)सी, 294, 504,505 (1) (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आज सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.