सांगली कारागृहात दारु, गांजा, दोन मोबाईल सापडले!
सांगली : खरा पंचनामा
येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृह आवारातील टॉवर क्रमांक २ च्या खाली गवतामध्ये दारु, गांजा आणि दोन मोबाईल असा ८४० रुपयांचा ऐवज आढळून आला. कारागृहातील कैद्याना देण्याच्या उद्देशाने कोणीतरी तेथे ठेवले असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
ही घटना रविवार दि. ५ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत वरिष्ठ तुरुंग अधिकारी महादेव होरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी जिल्हा कारागृहात असलेल्या टॉवर क्रमांक २ च्या खाली असलेल्या गवतामध्ये पोलिसांना प्रत्येकी एक लिटरच्या दोन बाटल्यामध्ये थोडी दारु भरलेली असल्याचे आढळून आले. तसेच दोन मोबाईल आणि खाकी रंगाच्या पाकिटात गांजा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अज्ञातावर कारागृह अधिनियमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.