एकाच घरात एक भाऊ कुणबी तर एक मराठा!
पुणे : खरा पंचनामा
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पेटला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा आणि आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या नऊ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत.
कुणबी प्रमाणपत्र दाखले देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्विकारला असून पुरावे असणाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप देखील सुरु केलं आहे. मात्र पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. आंबेगावमध्ये एक भाऊ कुणबी तर एक मराठा असा उल्लेख कागदपत्रांवर करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील महाळंगे येथे सख्ख्या भावांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी आढळून आली आहे. यात एकाची कुणबी तर दुसऱ्याची मराठा नोंद आहे. मराठा आरक्षणावरून राज्य पेटलेले असताना राज्य सरकारकडून आज मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मात्र मराठा आणि कुणबींमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे उघड होत आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे गावात दोन सख्ख्या भावांच्या दाखल्यांवर एकावर कुणबी आणि आणि एकावर हिंदू मराठा अशी नोंद आढळली आहे. आंबेगाव तालुक्यातील फक्त एका गावातच 1120 नोंदी आढळल्या आहेत. याबाबत शाळेने तसे पत्रही सादर केले आहे. त्यामुळे अशा अनेक गावांच्या नोंदी समोर येणे बाकी आहे. जना कृष्णाजी आंबटकर - कुणबी, सुदाम कृष्णाजी आंबटकर - हिंदू मराठा अशी नोंद या दोन भावांच्या दाखल्यावर आहे. मात्र अजूनही अनेक जणांची अशीच नोंद निघत आहे. राज्यातही असाच पेच निर्माण झाला आहे. काहींच्या नोंदी कुणबी तर नंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून लावल्या गेल्या आहेत. मात्र, आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची प्रमाणपत्रे व्हायरल झाल्याने प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.