तंबाखूच्या पिचकारीमुळे एका ४० वर्षीय व्यक्तीचा गेला जीव!
नाशिक : खरा पंचनामा
विहीतगाव भागात तंबाखूच्या पिचकारीमुळे एका ४० वर्षीय व्यक्तीचा जीव गेला. छतावरून पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. रत्नाकर मदन बोराडे (रा. मथुरारोड, विहीतगाव ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बोराडे गेल्या १७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या घराच्या छतावर शतपावली करीत असतांना ही दुर्घटना घडली. तंबाखूचे सेवन करून ते शतपावली करीत असतांना पिचकारी मारण्यासाठी ते वाकले असता अचानक इमारतीवरून पडले होते. या घटनेत त्यांच्या पाठीस व मानेस दुखापत झाली.
त्यानंतर भाऊ विनोद बोराडे यांनी त्यांना तातडीने आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता रविवारी (दि. ५) उपचार सुरू असतांना डॉ. कशफ मोकाशी यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.