ग्रामपंचायतीवर ताबा मिळवण्यासाठी काळ्या बाहुल्यांची अघोरी पूजा!
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील हरिपुरात ग्रामपंचायत निवडणुकीत काळ्या जादूचा वापर झाल्याची चर्चा आहे. अज्ञाताकडून काळ्या बाहुल्यांची पूजा केली गेली तर मोहिते पॅनलच्या कार्यकर्त्यांनी त्या बाहुल्या जाळून टाकल्या.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयासाठी सध्या टोकाचे प्रयत्न केले जात आहेत. सांगली नजीकच्या हरिपुरात निवडणुकीत चक्क काळ्या जादूचा वापर केला जात आहे. अज्ञाताकडून हरिपूरमध्ये बाहुल्यांची पूजा मांडण्यात आली.
यानंतर संतप्त मोहिते पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जादूटोणा केलेल्या बाहुल्या जाळून निषेध केला. हरिपूर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक सुरू आहे. यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. सध्या ग्रामपंचायतीवर बोंद्रे पॅनेलची सत्ता होती. सत्ताधारी गटाची सत्ता उलथवून लावण्यासाठी मोहिते पॅनल रिंगणात आहे.
यातून आरोप प्रत्यारोप सुरू आहेतच मात्र रात्री हरिपूर येथे एका ठिकाणी काळ्या बाहुलीची जादू सर्वांना धक्का देणारी ठरली. एका घराच्या बाहेर सात बाहुल्या पुजून ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली. निवडणुकीच्या विजयासाठी काहींनी हा प्रकार केल्याचा आरोप मोहिते पॅनलकडून करण्यात आला.
काळी जादू करून निवडणुका जिंकू पाहणाऱ्या विरोधकांना चपराक म्हणून मोहिते पॅनलकडून या बाहुल्या जाळून अंधश्रध्देला तिलांजली देण्यात आली अशी माहिती अशोक मोहिते यांनी दिली. तर अशी काळी जादू करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सत्तारूढ बोंद्रे पॅनलकडून करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.