Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कारागृहातून पळालेला कैदी अखेर जेरबंद सांगली एलसीबीची कारवाई

कारागृहातून पळालेला कैदी अखेर जेरबंद
सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेल्या कैद्याला जेरबंद करण्यात आले. आष्ट्याजवळील मिसळवाडी येथे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

सदाशिव अशोक सनदे (वय २५, रा. मिसळवाडी, ता. वाळवा) असे अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे. सनदे हा पोक्सो तसेच बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत होता. तो सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन बंदी होता. दि. ६ नोव्हेंबर रोजी त्याने कारागृहातून पलायन केले होते. त्यानंतर याबाबत सुबोध चव्हाण यांच्या तक्रारीनुसार सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सनदे याला शोधण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. 

पथक सनदे याचा शोध घेत होते. त्यावेळी सहायक निरीक्षक पवार यांना सनदे हा मिसळवाडी येथील त्याच्या घरात लपल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांच्या पथकाने तातडीने मिसळवाडी येथील त्याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्यावेळी धराच्या आडोशाला एकजण अंधारात थांबल्याचे दिसून आले. पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेतले. तो सदाशिव सनदे असल्याचे स्पष्ट झाले. त्याला अटक करून सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, अरूण पाटील, कुबेर खोत, रोहन घस्ते, सुनील जाधव, सूरज थोरात, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.