Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"माझ्या शेतकऱ्यांचे रान..." आव्हाडांनी शेअर केली वसंतदादांची आठवण

"माझ्या शेतकऱ्यांचे रान..." आव्हाडांनी शेअर केली वसंतदादांची आठवण



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्ती, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची आज (दि. १३) जयंती. यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. वसंतदादा पाटील पाटबंधारे मंत्री असतानाची आठवण त्यांनी शेअर केली आहे.

महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९१७ रोजी पद्माळे गावी झाला. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना सहकारमहर्षी म्हणून ओळखले जाते. वसंतदादा पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण पदांचा कारभार सांभाळला.

वसंतदादा पाटबंधारे मंत्री हो तेव्हाची एक आठवण जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या 'X' खात्यावर शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'महाराष्ट्र राज्याला अनेक दैदिप्यमान आणि वैचारिक मुख्यमंत्र्यांचा वारसा लाभला आहे. एक किस्सा असा होता, वसंतदादा तेव्हा पाटबंधारे मंत्री होते आणि श्री. चाफेकर हे त्यावेळी मुख्य अभियंता होते. ते नेहमी कोणत्या जलाशयात किती पाणी आहे याची माहिती घेत असत. कोणत्या खोऱ्यात किती.... कोणत्या खोऱ्यात किती अशी सतत विचारणा चालूच असे. तेव्हा एकदा दादा म्हणाले, 'अहो चाफेकर टी.एम.सी, घनफूट असे सांगू नका. माझ्या शेतकऱ्यांचे रान किती एकराने भिजल ते फक्त सांगा.'

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.