Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अदृश्य शक्ती मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावत आहे!

अदृश्य शक्ती मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावत आहे!



सांगली : खरा पंचनामा

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्या हा अंतर्गत असून निजाम मराठा विरुद्ध रयत मराठा असा संघर्ष सुरु आहे.

आरक्षणाच्या मुद्यावरुन अदृश्य शक्ती मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावण्याचं काम सुरु करत आहेत. आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते सांगली येते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरु असलेल्या एकमेकांवरील टीकेवरुन सर्वच नेत्यांनी राजकीय नीतीमत्ता पाळण्याचा सल्ला दिला. येत्या ३ डिसेंबर रोजी जार राज्यांचा निकाल हाती येईल. त्यानंतर ६ डिसेंबरनंतर अयोध्यामधून नवी मोहीम सुरु होईल, असं विधान करत राज्यात दंगली होतील, असा अलर्टनेस प्रत्येक पोलीस ठाण्याला मिळाला असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. देवेंद्र फडणवीस हे आरआरएसचे साधे प्रांतप्रमुख देखील होई शकले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तसंच केंद्राकडून अपरिपक्व धोरण राबवलं जात असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. केंद्राच्या अग्नीवीर योजनेवर निशाणा साधत त्यांनी या योजनेमुळे भारतीय सैन्य दलाचं मनोबल कमी होणार असून ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.