अभिनेते प्रकाश राज यांनी ईडीचं समन्स
बंगलुरू : खरा पंचनामा
प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या
चाहत्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रकाश राज यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) समन्स जारी केला आहे. आपल्या परखड वक्तव्यांसाठी आणि बिनधास्त अंदाजासाठी प्रकाश राज हे ओळखले जातात.
त्यांनी यापूर्वी अनेकदा सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ते चर्चेत राहिले आहे.
पॉन्झी योजनेशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांना समन्स जारी केले. याआधी ईडीने तामिळनाडूतील त्रिची येथील प्रणव ज्वेलर्सच्या जागेवर छापा टाकला होता. या प्रकरणी ईडी आता प्रकाश राज यांची चौकशी करणार आहे. प्रकाश राज प्रणव ज्वेलर्ससाठी जाहिरात करतात.
प्रकाश राज यांनी अनेकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शाब्दिक हल्ला केला आहे. यावेळी ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता या कारणास्तव तर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही ना.... असे प्रश्न त्यांच्या चाहत्यांनी उपस्थित केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.